Written by-Asha Kahale

Sept 17 2020
An image of pink lotus flower blooming beautifully in water

Marathi Kavita

तु जरी नसलीस

मराठी प्रेम कविता


Share this article on

तु जरी नसलीस, तरी,
तुझ्या आठवणी घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात अजूनही वसल्या आहेत.
रिकाम्या ह्या घराच्या भिंतीत
अजूनही तुझा मोठेपणा दिसतो.
प्रत्येक वस्तू ही तुझ्या स्पर्शाची आठवण सांगतेय.
देव घरातली तुझी भक्ती अजूनही मला प्रसन्नता देते,
स्वयंपाक घरात तुझ्या पदार्थांचा सुगंध अजूनही दरवळतो
आणि तुझ्या हातांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते.
अंगणातल्या झोपाळ्यावर तुझा मुक्तपणा आजही खेळतो,
झाडांच्या आंब्यात तुझा गोडपणा आज सुद्धा रंगतो,
गुलाबातून आज ही तुझा हसरा चेहरा डोकावतो,
आणि तुझ्या अनेक गम्मतीं बागेतले कृष्णकमळ आज पण मला सांगतो.
तु जरी नसलीस, तरी,
तुझ्या अस्तित्वाची साक्ष हे सर्व देत आहे
तुझ्यात घर आढळतं आणि
घरात तू आढळते.



You may also like

साक्षी
Mrunal Limaye
Sept 2018

झाडांच्या हिरव्या गर्दीत
आपले अस्तित्व सांभाळत
उभा असतो तो ...आत्ममग्न
एखाद्या चिंतनशील
तत्त्वज्ञासारखा

Continue reading

Invisisble spectators
Shrutika Kahale
Jan 2019

Remember the day you said? "No one's here, no one's watching." I almost believed you that day. Today, as I am here again, Here again after so long, I see us right here, at this window,

Continue reading


The name should contain a First name and a last name and should not contain numbers for eg jhon show
Comment should be 1-400 characters long.