Written by-Mrunal Limaye

Sept 23 2020
An image of a road with many turns through a forest
Marathi Kavita

सरळ रेषा

आयुष्यावर


Share this article on

आयुष्य नसतं सरळ रेषेसारखं
एका लयीत जाणारं
कळलं तिला अनेक वळणं
पार करुन गेल्यावर

प्रत्येक वळणावर एक थांबा
मागे वळून बघण्यासाठी
प्रत्येक थांब्यावर एक स्वप्न
पुढच्या प्रत्येक पावलासाठी.

पुढचं वळण अखेरचं की.....?
 श्वास थोडा रोखलेला
पुन्हा एकदा फसलेलो पाहून
जीव थोडा हसलेला.

शेवटी तरी समजेल का?
की प्रवास आता संपणार आहे
शेवटी एक सरळ रेषाच
सारी वळणे जोडणार आहे.

मृणाल लिमये.



You may also like

तु जरी नसलीस
Asha Kahale
Sept 2020

तु जरी नसलीस, तरी,
तुझ्या आठवणी घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात अजूनही वसल्या आहेत.
रिकाम्या ह्या घराच्या भिंतीत

Continue reading

साक्षी
Mrunal Limaye
Sept 2018

झाडांच्या हिरव्या गर्दीत
आपले अस्तित्व सांभाळत
उभा असतो तो ...आत्ममग्न
एखाद्या चिंतनशील
तत्त्वज्ञासारखा

Continue reading


The name should contain a First name and a last name and should not contain numbers for eg jhon show
Comment should be 1-400 characters long.