Written by-Mrunal Limaye

Oct 15 2020
 A book review being created on a pretty black typewriter.
Book Review in Marathi

Wise And Otherwise

BY SUDHA MURTY

Share this article on

किती किती प्रकारची, स्वभावाची माणसं वावरत असतात आपल्या अवतीभवती! काहींना आपण सहज वाचू शकतो, काही शेवटपर्यंत अनोळखीच राहतात. माणसं वाचणे ही एक कला आहे. आणि सुधा मूर्तींना ती चांगलीच अवगत आहे. कॉम्प्युटर सायन्स च्या प्राध्यापिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष, कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून तितक्याच सहजतेने लिहिणाऱ्या लेखिका म्हणून त्या आपल्याला परिचित आहेत. कामानिमित्त देश- परदेशात प्रवास करत असताना, त्याचप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये काम करताना अनेक प्रकारची, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील माणसं त्यांना भेटतात. 'Wise And Otherwise:A Salute to Life' या पुस्तकातून त्या आपल्याला अशा अफलातून ५१ व्यक्ती आणि वल्लींची भेट घडवतात. प्रामाणिक, साधीसुधी, चतुर, धूर्त, कावेबाज, कष्टाळू, इ. विविधरंगी मनुष्य स्वभावाचे नमुने या पुस्तकात भेटतात. कॉलेजला दोन महिने सुट्टी असल्याने खर्च करून राहिलेले शिष्यवृत्तीतले पैसे परत करणारा प्रामाणिक हनुमंतप्पा, ही जमीन, ही नदी, हे पर्वत यांतील आपण काहीच निर्माण केलेलं नाही; ही देवाची निर्मिती, त्याने आपल्याला भेट दिली; मग ती जमीन विकणारे किंवा खरेदी करणारे आपण कोण? असं बहुमोल ज्ञान देणारा ओडिशातील सुसंस्कृत, वृद्ध आदिवासी, स्वतःच्या वडिलांना अनोळखी व्यक्ती म्हणून वृद्धाश्रमात दाखल करणारा मुलगा, ही काही वानगीदाखल उदाहरणे. सुधा मूर्तींची भाषा प्रवाही आहे. आपलं इंग्रजी पुस्तक वाचताना वाचकाला डिक्शनरीची गरज भासू नये या उद्देशाने त्या साधे, सोपे, प्रचलित शब्द वापरतात. मनुष्य स्वभावाच्या चांगुलपणा पासून क्रूरपणा पर्यंत अनेक छटा त्या आपल्याला दाखवतात. नर्म विनोद ते उद्विग्नता तितक्याच थेटपणे मांडतात.
आपल्याला शहाणीव देणारं पुस्तक आहे हे.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी तितक्याच ताकदीने केला आहे



You may also like

The Immortals Of Meluha
Amish Tripathi
Aug 2020

The very popular and one of the most loved books, The Immortals of Meluha by Amish Tripathi, was my first mythological fiction, as well as it's the first part of Shiva Trilogy, and it's not surprising that it has undoubtedly captured a place to my favourites list. Amish takes you back in time to narrate a tale, that will climb up to and in your heart and make it a home. This tale tells us about Shiva, whose own karma,

Continue reading

And The Mountains Echoed
Khalid Hosseini
July 2020

Hosseini's first two books - ' The kite runner' and 'A thousand splendid suns' have undoubtedly made their place in the best seller list. A teller of tales as Hosseini has been, 'And the mountains echoed' is a beautiful journey in the spider web of tales, and to be honest, my very first one with Hosseini. The story focuses on the beauty and innateness of the sibling relation of Abdullah and Pari and blends you on. I called it a spiderweb of tales

Continue reading



The name should contain a First name and a last name and should not start with a number for eg jhon show
Comment should br 1-400 characters long.