Written by-Mrunal Limaye

Oct 4 2020
A beautiful Peacock Feather
Marathi Book Review

माँटुकले दिवस


Share this article on

लहानपणी आपल्याला मोठ्ठं व्हायचं असतं. शिक्षण, करियर, आर्थिक स्थैर्य इ. इ. होईपर्यंत आपण एवढे मोठे झालेलो असतो की एकेकाळी आपण लहान होतो हे विसरूनच जातो. पण हे लहानपण पुन्हा सापडूही शकतं बरं का. संदेश कुलकर्णींना सापडलं तसं.संदेश कुलकर्णींना आपण ओळखतो एक अभिनेता, पटकथालेखक, दिग्दर्शक म्हणून. बांद्रा (पूर्व) भागातील एक चाळवजा बिल्डिंग. मधोमध असलेल्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना घरं आणि त्यांना जोडणारी कॉमन बाल्कनी. दुसऱ्या मजल्यावर लेखक राहतो आणि पलिकडील बाजूला राहतो नील - हिंदी भाषिकमुलगा- पण लाडाने त्याला सगळे मॉंटू म्हणतात. हाच आपला या पुस्तकाचा हीरो. वय वर्ष ३.३९ वर्षांच्या संदेशला पुन्हा लहान करण्याची किमया करणारा हाच मॉंटू. मुलात मूल होऊन राहणे म्हणजे आपले मोठेपणीचे सगळे ईगो, हेवेदावे, अनुभव बाजूला ठेवणे. नेमकं हेच साध्य झालंय संदेशला. मॉंटूचं जग सध्यातरी त्याच्या बिल्डिंग पुरतंच मर्यादित आहे. त्याची शाळा दीड तासच भरते आणि ती बिल्डिंगच्या तळमजल्यावरच आहे... पण बरीच कामंही आहेत त्याला बरं का. ढीगभर खेळणी पसरुन बसणं, बाल्कनीतल्या कावळे, मुंग्या निरखून बघणं, ड्रर sss असा आवाज काढत इकडे तिकडे पळणं,..... इ.इ.मोठ्यांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी छोट्यांना दिसत असतात. मग बिल्डिंगच्या जिन्याची आगगाडी होते आणि मॉंटू नि संदेश वर्ल्ड टूर ला निघतात. जिन्याच्या... सॉरी आगगाडीच्या.. बाजूच्या भिंतीत एक खिडकी तयार होते. त्यातून अंटार्क्टिकाच्या पेन्ग्विन पासून द. आफ्रिकेतल्या सिंहांपर्यंत कुणीही दिसतं. पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तितका वेळ ट्रेन थांबते.मॉंटू वेगवेगळ्या भूमिका सहजपणे वठवतो. कधी कृष्ण, तर कधी गणपती बाप्पा. कधी सिंह तर कधी कीडा. मॉंटूचे हे खेळकर विभ्रम, त्याला वाटणाऱ्या वेगवेगळ्या भीत्या, त्याची निरागसता इ. संदेश कुलकर्णींनी तरलपणे टिपलेत. मॉंटूच्या, त्याच्या मैत्रिणी सिद्धा आणि सिद्रा यांच्या गमतीजमती भन्नाट स्टाईल मध्ये लिहिल्यायत. त्यातील एक उतारा...
कोण कुठला छोट्या, किती माझ्या आत खोलवर जाऊन बसला होता. त्याच्या नकळत त्यानं मला आयुष्याविषयी बारकाईनं विचार करायला लावला होता. माझ्या लेखनाची एकाकी लढाईतली धार सुसह्य केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या निखळ प्रेमानं माझ्या हृदयाला नरम केलं होतं. माझ्यातला प्रेमळ माणूस त्यानं बाहेर काढला होता. ' बडा बन गया हूँ ' म्हणणाऱ्या ह्या छोट्याविषयी मला ऋणी वाटत होतं.
मॉंटूला आमच्या नात्याविषयी काय वाटत असेल असा विचार मनात येऊन गेला आणि मला हसू आलं. मी त्याला पकडून त्याचा पापा घेतला. मॉंटू माझे विचार वाचायचा प्रयत्न करत असल्यासारखा माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, " संदेश, तुम्हारी ऑंखोंमें मैं खुदको देख सकता हूँ. " मी दचकलोच. हा गडी मन वाचण्याइतका मोठा झाला की काय?
तो माझ्या डोळ्यांकडे बोट दाखवत म्हणाला, " तुम्हारी ऑंखोंमें मैं खुदको देख सकता हूँ. "
मी हसलो आणि त्याच्या डोळ्यांच्या बाहुलीत पाहत म्हणालो, " हॉं मॉंटू, मैं भी तुम्हारी ऑंखोंमें खुदको देख सकता हूँ. "
असं मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारं पुस्तक आहे हे.. ' मॉंटुकले दिवस'. या पुस्तकाइतकाच माधुरी पुरंदरेनी लिहिलेला त्याचा ब्लर्बदेखील वाचनीय आहे. मोठ्ठे झालेल्या आपल्याला लहानपणीचा आनंद मिळवून देणारा खजिना!!!



You may also like

The Immortals Of Meluha
Amish Tripathi
Aug 2020

The very popular and one of the most loved books, The Immortals of Meluha by Amish Tripathi, was my first mythological fiction, as well as it's the first part of Shiva Trilogy, and it's not surprising that it has undoubtedly captured a place to my favourites list. Amish takes you back in time to narrate a tale, that will climb up to and in your heart and make it a home. This tale tells us about Shiva, whose own karma,

Continue reading

And The Mountains Echoed
Khalid Hosseini
July 2020

Hosseini's first two books - ' The kite runner' and 'A thousand splendid suns' have undoubtedly made their place in the best seller list. A teller of tales as Hosseini has been, 'And the mountains echoed' is a beautiful journey in the spider web of tales, and to be honest, my very first one with Hosseini. The story focuses on the beauty and innateness of the sibling relation of Abdullah and Pari and blends you on. I called it a spiderweb of tales

Continue reading


The name should contain a First name and a last name and should not contain numbers for eg jhon show
Comment should be 4-400 characters long amd should not contain numbers