Written by-Mrunal Limaye

Sept 25 2020
A beautiful Peacock Feather

Marathi Kavita

आजही सर्व तसेच आहे



Share this article on

देवकीच्या पोटातून
यशोदेच्या ओटीत
गेलेला तू.....
तिच्या अंगणातून अलगद निसटलास

काल परवा यमुनातटी
पेंद्यासवे खेळता खेळता
पटकन् नजरेआड
झालास..
बासरीच्या सुरांची
मोहिनी पडलेल्या
राधेला .....तू दिसलास
पाठमोरा......क्षितिजापल्याड जाताना
आहे माहीत तू आहेस निर्मोही
आणि अजन्माही.

पण सावळ्या, एकदाच
फक्त एकदाच परत जन्म घे
फिरून गोकुळात ये
दिसेल तुला उंबरठ्यावर
उभी यशोदा
तुझीच वाट पाहताना;
दिसतील कदंबाखाली
रास रचून गोपगोपी
तुझ्या एका पदन्यासासाठी
आतुरलेले..
आणि कालिंदीच्या जळात
पाय सोडून बसलेली राधा,
तुझ्या विश्वमोहिनीची धुंदी
अजून नाही ओसरलेली..
आणि उमजेल तुला मुकुंदा
की युगांपूर्वीच्या गोकुळात
आजही सर्व तसेच आहे.



You may also like

Struggles of a rape survivor
Shrutika Kahale
Sept 2020

He will do the same, but it won't be the same. There's a difference in love and lust, I tell my mind, I hammer it, saying, "he's the one I chose, the one I trust".

Continue reading

Bathroom Thoughts
Shrutika Kahale
Sept 2020

i) Age eight: Sitting on a sea saw, a silky straight haired girl making me loath my frizzy curls with hate. Or at least what I assumed to be hate. Up and down, Up and down. Envy, they go up and we ultimately feel lower than them. It was envy.

Continue reading


The name should contain a First name and a last name and should not contain numbers for eg jhon show
Comment should be 1-400 characters long.